पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींकडून एकादशी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगणारे ट्विट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मराठीतून ट्विट करीत नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नागरिकांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'विठूराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

त्याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे, पालखी सोहळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून बघितला होता. या व्हिडिओमध्ये पंढरपूरचे महत्त्वही सांगण्यात आले आहे. अनेकांनी नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ आणि एकादशीनिमित्त त्यांनी केलेले ट्विट लाईक तसेच रिट्विट केले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी पहाटे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा लातूर जिल्ह्यातील विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यासोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.