पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीला वाचवायचं असेल तर लष्कराकडे सोपवाः ओवेसी

दिल्लीला वाचवायचं असेल तर लष्कराकडे सोपवाः ओवेसी

सीएए विरोधात सुरु असलेले दिल्लीतील हिंसाचार संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. या हिंसक आंदोलनासमोर पोलिसही हतबल झाल्याचे दिसत आहे. या आंदोलनाला लगाम लावण्यासाठी आता भारतीय लष्कराला पाचारण करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून होताना दिसत आहे. एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनीही ईशान्य दिल्लीतील परिस्थिती पाहता तिथे सैन्य दलाला उतरवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

ओवेसी पुढे म्हणाले की, ईशान्य दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. जर पंतप्रधान कार्यालयाला इथे पुन्हा शांतता हवी असेल तर हा परिसर लष्कराकडे सुपुर्द केला पाहिजे. पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे. तेथील लोकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर हा परिसर आता लष्काराच्या हवाली केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द

दरम्यान, ईशान्य दिल्लीतील भजनपुरा चौकानजीक दोन गटात भीषण दगडफेक झाली. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात तणाव वाढला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी याची गरज भासल्यास निश्चितच विचार केला जाईल. सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच आवश्यकतेनुसार पुरेशा संख्येत पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, असेही गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आल्याचे ते म्हणाले होते.

कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात नवा 'शेर'