पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी भारतातच राहणार पण कोणताही पुरावा दाखवणार नाही'

असदुद्दिन ओवेसी

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेला गदारोळ अद्याप शांत झालेला नाही. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आवाज उठविणारे 'मर्द-ए-मुजाहिद' असल्याचे ओवेसींनी सांगितले.

SC/ST कायद्यातील सुधारणा वैध, तक्रारीनंतर चौकशीआधी अटक शक्य

ओवेसी यांनी म्हटले आहे की, मी या देशातच राहणार आहे. पण कोणताही पुरावा दाखवणार नाही. जर पुरावा मागितला तर आम्ही आमची छाती पुढे करू आणि सांगू की घाला गोळ्या. मारा छातीवर गोळ्या कारण याच ठिकाणी असलेल्या ह्रदयात भारतमातेचे प्रेम आहे.

एकाच भूमिकेसाठी दुसऱ्यांदा 'जोकर'ला ऑस्कर

सुधारित नागरिकत्व कायदा हा केवळ नागरिकत्व देणारा कायदा नाही तर नागरिकत्व काढून घेणाराही असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वीच ओवेसी यांनी केला होता. आसाममध्ये पाच लाख मुस्लिमांना नागरिकत्व देण्यात आले नाही. पण आता आसाममधील बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मी घुसखोर नाही तर घुसखोरांचा बाप आहे, अशा स्वरुपाचे वक्तव्यही असदुद्दिन ओवेसी यांनी केली होते.