पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणातील दोषींना शुक्रवारी फाशी, मुकेश सिंहची याचिका फेटाळली

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ज्या दिवशी बलात्कार झाला त्या दिवशी आपण दिल्लीमध्ये नव्हतो, असे दावा मुकेश सिंह याने केला होता. त्याची याचिका आधी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली. या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी, २० मार्चला दिल्लीतील तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात येणार आहे.

हे युद्ध विषाणूविरोधात, सर्वांनी सहकार्य करावे: मुख्यमंत्री

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सविस्तर आणि तर्कपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही, असे न्या. ब्रजेश सेठी यांनी म्हटले आहे. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता या चौघांनाही फाशी देण्यात येणार आहे.

कोरोना इम्पॅक्ट : दोन विमान कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

तिहार तुरुंगात ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे. त्या ठिकाणाची गुरुवारी पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली. यावेळी पवन जल्लादही उपस्थित होते. पवन जल्लाद हेच चौघांना फाशी देणार आहेत. याआधी तीन वेळा या चौघांची फाशीची शिक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. या चौघांनीही राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या फेरविचार आणि न्यायसुधार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळल्या आहेत.