पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात, तज्ज्ञांचे मत

विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर जिथे उतरणार होते. तिथे शुक्रवारपासून चंद्रावरील अंधार (लुनार नाईट) होण्यास सुरुवात होणार असल्यामुळे आता विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रम लँडरशी बंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाचा संपर्क प्रस्थापित व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. 

निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यातील सोलर पॅनेल कार्यरत होणे अपेक्षित होते. पण विक्रम लँडरचे नक्की काय झाले हे संपर्क तुटल्यामुळे अद्याप समजू शकलेले नाही. विक्रम लँडरची निर्मिती करताना तो उणे १८० डिग्री सेल्सियस तापमान काम करू शकेल, या पद्धतीने तयार करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर लुनार नाईट सुरू झाल्यावर विक्रम लँडर कार्यरत होणे अवघड असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर उतरणार होता. पण लँडिंगच्या अवघ्या काही क्षण आधी विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून इस्रोतील शास्त्रज्ञ विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते. 

नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना, जागतिक नेतृत्त्वासाठी उपयुक्त दौरा

बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधील भौतिक शास्त्र विषयातील सहायक प्राध्यापक निरूपम रॉय म्हणाले, आपण आता म्हणू शकतो की विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. विक्रम लँडरवरील रोव्हरचे आयुष्य संपुष्टात आले आहे. लुनार डेमध्ये प्रयोग करण्यासाठी विक्रम लँडर पाठविण्यात आले होते. लुनार नाईटमध्ये काम करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली नव्हती.