पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत इराणला अण्वस्त्रं वापरु देणार नाही: ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

इराकमधील अमेरिकेच्या ताब्यातील तळांवर इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये एकाही अमेरिकन सैनिकावर जीव गमावण्याची वेळ आली नाही, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशवासियांना संबोधित करताना दिली. इराकमधील अमेरिकन तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी सैनिक सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेचे सैन्यदल हे शक्तिशाली असून त्यांचे कसब कौतुकास्पद होते, असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.  

क्षेपणास्त्र हल्ल्यात '८० अमेरिकी दहशतवादी' मारले गेले, इराणचे प्रत्युत्तर

इराणचा वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानी अमेरिकेन नागरिकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याला यापूर्वी संपवायला हव होतं. मागील सरकारने पुरवलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावरच इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर हल्ले केले, असे सांगत त्यांनी आपल्या विरोधकांवरही तोफ डागली. जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत इराकला अण्वस्त्रांचा वापर करु देणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.  डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना इराणला युद्धाची धमकी देणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. युद्धाची धमकी न देता त्यांनी  इराणवर अर्थिक निर्बंध लादणार असल्याचे सांगत त्यांची आर्थिक कोंडी करणार असल्याचे संकेत यावेळी दिले.  

इराणने अमेरिकन सैन्याला 'दहशतवादी' घोषित केले

इराणने दहशतवाद्यांना समर्थन देणं थांबवावे, तसेच रशिया आणि चीन या राष्ट्रांनी त्यांना कोणत्याही प्रकारे पाठिंबा देऊ नये, असे सांगत ट्रम्प यांनी चीन आणि रशियालाही इशारा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या इराणविरोधात युरोपियन राष्ट्रांनी एकत्र यावे, असे आवाहन देखील केले आहे.  अमेरिकेकडून ड्रोनच्या साह्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचा वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानी मारला गेला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: As long as I am the President Iran will never be allowed to have nuclear weapon US President Donald Trump on Irans strike against US military installations in Iraq