पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेतील कोरोनाच्या हाहाकाराचे चिनी कनेक्शन आले समोर

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूवरील चीनच्या खुलाशानंतर काही दिवसांतच सुमारे ४३०००० लोक चीनमधून थेट अमेरिकेत आल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, यातील अनेक जण असे होते की, जे या विषाणूचे केंद्र ठरलेल्या वुहानमधून थेट अमेरिकेत आले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वी सुमारे १३०० थेट उड्डाणे अमेरिकेतील १७ राज्यात आली आणि यातून लाखो लोक येथे आले होते. 

देशातील २७४ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, २६७ रुग्ण झाले बरे

या वृत्तात म्हटले आहे की, चीनच्या अधिकाऱ्यांकडून नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांसमोर या प्रकोपाचा खुलासा न्यूमोनियासारख्या रहस्यमयी आजार म्हणून करण्यात आला होता. त्यानंतर किमान ४३०००० लोक चीनमधून थेट अमेरिकेत आली. दोन्ही देशातील आकडे एकत्रित केल्यानंतर यामध्ये ४०००० असे लोकही सहभागी होते, ज्यांनी अशा प्रवासावर ट्रम्प यांच्याकडून बंदी घालण्यापूर्वी दोन महिन्यांपर्यंत प्रवास केला होता. 

मोदींची प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, सोनियांसह बड्या नेत्यांशी चर्चा

या वृत्तात असेही म्हटले की, विमानतळांवर चीनवरुन आलेल्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याची प्रक्रियाच कार्यरत नव्हती. जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसांत चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही केली जात नव्हती. त्यामुळे आजाराने कोणता व्यक्ती संक्रमित आहे, हे समजत नव्हते. चिनी अधिकारीही हा आजार गांभीर्याने घेत नव्हते. 

कोरोनाशी लढा : तैवानच्या त्या मास्टर प्लानमुळे वाचले लोकांचे प्राण

जानेवारीच्या मध्यापासून आरोग्याची तपासणी सुरु करण्यात आली. पण केवळ वुहानमधून येणाऱ्या प्रवाशांचीच आणि तीही फक्त लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क विमानतळावरच केली जात होती. त्यावेळीपर्यंत सुमारे ४००० लोक आधीच वुहानहून थेट अमेरिकेत आले होते, असे चीनची विमान डेटा कंपनी वारीफ्लाएटच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:As Coronavirus spread 430000 people arrived in US on direct flights from China says the New York Times