पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुसलमान असूनही भारतात स्वतःला सुरक्षित समजतोः अदनान सामी

अदनान सामी

गायक, संगीतकार अदनान सामी आता भारताचा नागरिक बनला आहे. लंडनमध्ये जन्मलेला आणि मूळ पाकिस्तानचा असलेला अदनान आता भारतालाच आपले घर मानतो. नुकताच त्याने एका कार्यक्रमात भारताबद्दलचे आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले. मुसलमान असूनही स्वतःला भारतात खूप सुरक्षित समजतो, असे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थन करत येथे कायदा लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यास मदत करेल आणि याचा भारतात सध्या राहत असलेल्या लोकांशी काहीही संबंध नाही, असे अदनानने एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. 

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

एका प्रश्नाचे उत्तर देताना अदनान म्हणाला की, जे लोक भारताचे नागरिकत्व घेऊ इच्छितात. त्यांना ते लवकरात लवकर मिळावे यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा बनवला आहे. हा कायदा भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी नाही. 

वर्ष २०१५ मध्ये अभिनेता आमिर खानने आपल्या पत्नीला भारतात सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते. त्यावर अदनान म्हणाला की, आमिर खानने काय म्हटले यावर मी उत्तर द्यायला आलेलो नाही. माझ्याबाबत बोलायचे म्हटले तर मी एक मुस्लिम आहे. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो, मी मानवतेचा सन्मान करतो.

दंगलखोरांकडूनच नुकसानीची वसुली, दिल्ली पोलिस घेणार

माझ्याकडे अनेक पर्याय होते. पण मला वाटले की मला भारतात यायला हवे. मी एक मुस्लिम म्हणून हे म्हणू शकत नाही की भारतात मला किती सुरक्षित वाटते, असे तो म्हणाला. तसेच दिल्लीतील हिंसाचारावर त्याने म्हटले की, मला वाटते की लवकरच तिथे शांतता प्रस्थापित होईल. एक संगीतकाराच्या नात्याने मी नेहमी प्रेम आणि शांततेबाबत बोलतो. मी आवाहन करतो की, सर्वांनी शांतता राखावी. लोकांच्या आयुष्याचा सन्मान करा. असा कोणताही मुद्दा नाही की ज्याचा चर्चेतून तोडगा निघू शकत नाही. मला वाटते देशात शांतता नांदायला हवी.

... म्हणून मंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात सर्वांसमोर खाल्ले चिकन!

दरम्यान, अदनान सामीला नुकताच पद्मश्री देण्यावरुन मोठा वाद झाला होता. मनसेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी याचा विरोध केला होता. अदनानचे वडील अर्शद सामी खान हे पाकिस्तान हवाई दलात वैमानिक होते आणि त्यांनी भारताविरोधात १९७१ च्या युद्धात भाग घेतला होता. त्यामुळे अदनानला पद्मश्री देण्यास विरोध केला होता.