पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरविंद केजरीवाल यांचा येत्या रविवारी शपथविधी, रामलीला मैदानावर सोहळा

अरविंद केजरीवाल

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल येत्या रविवारी, १६ फेब्रुवारीला पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव; सामनातून भाजपवर निशाणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत एकतर्फी शानदार कामगिरी करीत ६२ जागांवर विजय मिळवला. मतमोजणीपूर्वी आम्हीच सत्तेत येणार असा दावा करणाऱ्या भाजपला सलग दुसऱ्यांदा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला आमदारांची दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भाजपचे केवळ ८ आमदार निवडून आले आहेत. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागांवर विजय मिळाला होता.

दिल्लीतील विधानसभा निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्याभोवतीच फिरली. प्रचारात भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्यावरच निशाणा साधण्यात आला. आम आदमी पक्षाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्लीतील नागरिकांसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या. त्याचबरोबर मोफत प्रवासाचे काही निर्णय महिलांसाठी घेण्यात आले. त्याचाही फायदा आपला निवडणुकीत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे वक्तव्य

दिल्लीतील निवडणुकीत काँग्रेसलाही नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. गेल्यावेळीही दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता.