पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवाल यांनी घेतली मोदींची भेट, दिल्ली हिंसाचारातील दोषींवर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. या भेटीत ईशान्य दिल्लीत नुकताच झालेल्या हिंसाचारावर चर्चा झाली. त्याचबरोबर कोरोना विषाणूवरुनही चर्चा झाली. मागील महिन्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदाच भेट घेतली. 

मुलाखतीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, दिल्ली हिंसाचारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, असे मी पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूविरोधात एकत्र लढण्यावर चर्चा केली. 

ते पुढे म्हणाले की, रविवारी दंगल उसळल्याच्या अफवेवर दिल्ली पोलिसांनी वेगाने काम केले. अशाच पद्धतीने दिल्लीत झालेल्या हिंसाचारावेळीही काम केले असते तर अनेकांचा जीव वाचवता आला असता. 

तत्पूर्वी, केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. परंतु, पंतप्रधानांना या कार्यक्रमाला हजेरी लावता आली नव्हती.