अरविंद केजरीवाल यांनी शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. केजरीवाल हे सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दि. ११ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे निकाल समोर आल्यापासूनच आपने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु केली आहे.
निर्भया प्रकरणः सुनावणीदरम्यान न्या. भानुमती यांना आली भोवळ
प्राप्त माहितीनुसार, अरविंद केजरीवाल हे १६ फेब्रुवारी रोजीच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना बोलावले आहे. त्याशिवाय त्यांनी दिल्लीच्या ७ खासदारांनाही निमंत्रण दिले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी हे १६ फेब्रुवारीला आपला मतदारसंघ वाराणसीला जाणार आहेत. वाराणसीत ते सुमारे १७०० कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करणार आहेत.
Delhi CM-designate Arvind Kejriwal has invited Prime Minister Narendra Modi to attend his swearing-in ceremony on 16th February. (file pic) pic.twitter.com/0M2DhlX5Re
— ANI (@ANI) February 14, 2020
VIDEO: एकमेकांचा पाठलाग करत काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी
आपचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवल्याचे सांगितले. दिल्लीतील सात खासदार आणि भाजपच्या आठ नवनिर्वाचित आमदारांनाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या सोहळ्याला इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम खास दिल्लीकरांसाठी असल्याचे त्यांनी म्हटले.
या 'जवान प्रेमी'ने पुलवामातील शहीदांना वाहिली अनोखी श्रद्धांजली
हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानात होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा आपला मिळाल्या आहेत.