पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीमध्ये ४ नोव्हेंबरपासून लागू होणार सम-विषम योजना: केजरीवाल

अरविंद केजरीवाल

राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा सम-विषय योजना लागू होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. हा नियम येत्या ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान लागू होणार आहे. दिल्लीतील प्रदूषणाला लक्षात घेता केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीच्या भावाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत सम-विषम योजनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 'दिल्लीतील रस्त्यावर ४ नोव्हेंबरला सम क्रमांकाच्या गाड्या धावतील. तर ५ नोव्हेंबरला विषम क्रमांकाच्या गाड्या धावतील. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी  मास्क मिळणार आहे. ऑक्टोबरपासून दिल्ली सरकार मास्कचे वाटप करणार आहे. तसंच दिल्लीमध्ये पर्यावरण मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.', अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र आणि पंजाब सरकारसोबत आम्ही आपल्या स्तरावर चर्चा करत आहोत. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सम-विषम योजना लागू केल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी यावर्षी देखील सरकारने निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असून प्रदूषणामध्ये २५ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केजरीवाल यांनी यावेळी दिली. 

सलग ४ दिवस बँक राहणार बंद; महत्वाची कामं आताच करा