पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील निगमबोध घाटावर जेटलींवर होणार अंत्यसंस्कार

भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर रविवारी दुपारी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजप नेते सुधांशु मित्तल यांनी याची माहिती दिली. जेटलींनी शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना ९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

जेटली माझ्यासाठी वडिलांसमान होते, गंभीरचे भावूक ट्विट

जेटली यांचे पार्थिव त्यांच्या कैलाश कॉलनीतील घरी नेण्यात येईल. रविवारी सकाळी पार्थिव भाजप मुख्यालयात आणले जाईल. तिथे राजकीय पक्षांचे नेते त्यांना अखेरचा निरोप देतील. भाजप मुख्यालयातून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाटावर नेले जाईल.

स्पष्ट विचार असलेला विद्वान नेता, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा होत होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना सॉफ्ट टिशू सरकोमा झाला होता. हा एकप्रकारचा कर्करोग आहे. त्यांना मधुमेहही होता. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. वाढत्या वजनापासून सुटका करण्यासाठी त्यांच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींचे 'संकटमोचक' सहकारी अरुण जेटली