पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींचे 'संकटमोचक' सहकारी अरुण जेटली

पंतप्रधान मोदींचे 'संकटमोचक' सहकारी अरुण जेटली

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटलींनी अर्थमंत्री म्हणून मोठे योगदान दिले आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात जितके महत्वाचे निर्णय घेतले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जेटली हे एक महत्वाचे भागीदार होते. मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात तत्परतेने जे निर्णय घेतले ते अरुण जेटली यांच्या योगदानाशिवाय शक्य नव्हते. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींच्या ते अत्यंत जवळचे मानले जात. अर्थमंत्री म्हणून जेटलींच्या कार्यकाळात नोटबंदी, जीएसटी, दिवाळखोरी विषयकचे विधेयक, जनधन योजना, रोकड हस्तांतरणासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांचा चेहरा भलेही पंतप्रधान मोदी असले तरी त्याची पटकथा अरुण जेटली यांनी लिहिल्याचे मानले जाते. 

अनेक राजकीय विश्लेषक तर अरुण जेटलींना पंतप्रधान मोदी यांचे संकटमोचक सहकारी असल्याची उपमा देत. स्वतः मोदींनी जेटलींचे अनेकवेळा कौतुक करत मंत्रिमंडळाचे ते हिरा असल्याचे म्हटले आहे. 

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हाही काँग्रेस किंवा विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करत. त्यावेळी सरकारची बाजू किंवा विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मोदींची पहिली पसंती ही जेटली होते. 

जेटली हे मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी होते, असे राजकीय विश्लेषक मानतात. त्यामुळेच जेटली यांनी केवळ आर्थिक बाबींवर नव्हे तर सर्वच विषयांवर सरकारची बाजू यशस्वीपणे मांडत असत. पंतप्रधान मोदी हे जेटलींच्या सल्ल्याशिवाय एकही निर्णय घेत नसत, असेही बोलले जाते.