पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारने काश्मीरचा 'कॅन्सर' उखडून काढला : अनुपम खेर

अनुपम खेर

मोदी सरकारने जम्मू काश्मीरला कॅन्सरमुक्त केलं, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते अनुपम खेर यांनी कलम ३७० रद्द झाल्यानंतर मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विकास होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

अनुपम खेर सध्या न्यूयॉर्कमध्ये असून त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे राज्यासाठी कॅन्सरसारखे होते. अखेर याचा इलाज झाला. यामुळे राज्यातील विकासाला चालना मिळेल. हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आहे. काश्मीरी असल्याने हा निर्णय अधिक भावनिक आणि शक्तीशाली वाटतो, असा उल्लेखही अनुपम खेर यांनी केला आहे. 

कलम ३७० रद्द : जम्मू-काश्मीरमध्ये होणारे चार मोठे बदल

काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा आणि या राज्याची दोन भागांत विभागणी करण्याचे विधेयक सभागृहात सादर केले. राज्यसभेत त्याला मंजूरी मिळाली. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ मतांचा फायद्यासाठी ३७० कलम हटविले नाही. हे कलम अस्थायी स्वरुपाचे आहे. आता हे विधेयक हटविण्याची वेळ आली असल्याचे सांगत अमित शहांनी विरोधकांना टोला लगावला.

कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चिडचिड

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Article 370 was a cancer that was harming JammuAndKashmir for last several decades we have finally found a cure Says Anupam Kher