पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अटक   

ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर नजरकैदेत असलेल्या दोन मोठ्या विरोधी नेत्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी ६ पासून राज्यात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जमाव बंदीच्या पार्श्वभीमूवर लागू करण्यात आलेल्या या कलमाअंतर्गत ४ हून अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत, असे जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी आदेशात म्हटले होते. जम्मूत मोबाइल, इंटरनेट बंद करण्यात आली होती.

मोदी सरकारने काश्मीरचा 'कॅन्सर' उखडून काढला : अनुपम खेर 

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या आधीच रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आज सकाळी संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचे समजते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही नेत्यांसह पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे.   

कलम ३७० रद्द : जम्मू-काश्मीरमध्ये होणारे चार मोठे बदल

रविवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या श्रीनगर येथील निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक पार पडली होती.  या बैठकीला मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन आणि काँग्रेस नेतेही उपस्थित होते. त्यात सरकारने ३७० कलम हटविल्यास करावयाच्या आंदोलनाची रणनीती ठरविल्यात आल्याचे वृत्त आहे.