पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन नव्या कायद्यांवर फोकस

भाजप (संग्रहित छायाचित्र)

कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावणे आणि आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवणे या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलेले केंद्रातील भाजप सरकार पुढील काळात दोन महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. यामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा यांचा समावेश आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतर्गंत याची चर्चा सुरू झाली आहे.

आसाममधील निदर्शनांमुळे जपानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द होणार?

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करीत होते. त्यावेळी काही नेत्यांनी त्यांच्याकडे समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची मागणी केली. लोकांचा याला मोठा प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सर्व मोठ्या निर्णयांची सूचक माहिती त्यांच्या भाषणांमधून देत असतात. त्यातून अनेक संकेत मिळतात. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी लहान कुटूंब ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर लहान कुटूंब हे सुद्धा देशभक्तीच असल्याचे सांगितले होते. 

संस्कृतमधून बोलल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो - भाजप खासदार

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले होते की, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपल्याला येणाऱ्या पिढीबद्दल विचार केला पाहिजे. कुटूंब लहान असेल तर आपल्यासोबत देशाचेही भले होईल. लहान कुटूंब ठेवणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. जी लोक या संदर्भात काम करीत आहेत त्यांना सन्मानित करण्याची गरज आहे.