पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखले

राहुल गांधीसह विरोधी पक्षाच्या गटनेत्यांना श्रीनगर विमान तळावरच रोखण्यात आले.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ८ पक्षांच्या ११ नेत्यांच्या शिष्टमंडळासह श्रीनगर विमानतळावर पोहचले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सांगत राहुल गांधींसह त्यांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरच्या विमानतळावरच रोखण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना कोणत्याही नेत्यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही. पोलीस प्रशासनाने त्यांना विमानतळावरुनच दिल्लीला परत धाडण्यात येत असल्याचे वृत्त आहे. 

केंद्राने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यानच्या काळात या परिसरात हिंसक घटना घडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर उत्तर द्यावे, असे राहुल गांधीने म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना सुनावले होते. राज्यात कोणत्याही प्रकारच्या हिंसक घटना घडलेल्या नाहीत. राहुल गांधींनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थिती पाहावी आणि त्यानंतर भाष्य करावे. राहुल गांधींना काश्मीर दौऱ्यावर येण्यासाठी विमान पाठवतो, असा टोला सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना लगावला होता.  

J&K : शुक्रवारच्या नमाजनंतर फुटीरतावादी संघटनांकडून निदर्शने

सत्यपाल मलिक यांनी दिलेले निमंत्रण स्विकारल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्विटवरुन दिली होती. आमच्या काश्मीर दौऱ्यासाठी तुम्ही विमान पाठवण्याची गरज नाही. पण त्याठिकाणी आल्यानंतर तेथील नेत्यांना आणि जनतेला भेटण्याचे स्वातंत्र्य द्या. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना प्रत्त्युत्तर दिले होते. 

त्यानंतर शनिवारी राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली ११ जणांचे शिष्टाचार मंडळ श्रीनगरमध्ये पोहचले. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे नेते मनोज झा हे नेते राहुल गांधीसोबत होते. सुरक्षेच्या कारणास्तव या शिष्टमंडळाला विमानतळावर रोखून त्यांना दिल्लीला जाण्यास सांगण्यात आले.