पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर हिंदू बहुल राज्य असते तर कलम ३७० हटवले नसतेः चिदंबरम

पी. चिदंबरम

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीर हिंदू बहुल राज्य असते तर भाजपने विशेष राज्याचा दर्जा काढला नसता. पण काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्याक असल्यानेच हे कलम हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जम्मू-काश्मीर अस्थिर आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे ही अशांतता प्रसारित करत आहे. पण भारतीय माध्यमे असे करताना दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले.  

ते म्हणाले, त्यांचा (भाजप) काश्मीरमधील परिस्थिती ठीक असल्याचा दावा आहे. जर भारतीय माध्यमे जम्मू-काश्मीरमधील अशांततेच्या स्थितीचे वार्तांकन करत नसतील तर याचा अर्थ स्थिरता आहे का?, त्यांनी सात राज्यातील सत्तारुढ प्रादेशिक पक्षांवर आरोप केला. या पक्षांनी राज्यसभेत भाजपविरोधातील भीतीमुळे सहकार्य केले नसल्याचे म्हटले.

...नाहीतर काश्मीर हातातून जाईलः दिग्विजय सिंह

विरोधी पक्षाच्या असहकार्यावर असंतोष व्यक्त करताना म्हटले की, आम्हाला माहीत आहे की, लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही. पण सात पक्षांनी (अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजद, आप, टीएमसी, जेडीयु) सहकार्य केले असते तर विरोधी पक्ष राज्यसभेत बहुमतात असला असता. हे अत्यंत निराशाजनक आहे.

जम्मू-काश्मीरमधील सौरा भागात सुमारे १० हजार लोकांनी विरोध केला. हे एक सत्य आहे. पोलिसांनी कारवाई केली, हे एक सत्य आहे, आणि विरोधादरम्यान गोळीबार झाला हे वास्तव आहे, असे ते म्हणाले.

Exclusive: ३२८ फरार दहशतवाद्यांचा देशभरातून शोध

भाजपविरोधात ही सभा झाली होती. ते म्हणाले की, देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचे असे एकही उदाहरण नाही.

Article 370: मोदी-शहा जोडी कृष्ण अन् अर्जुनासारखी- रजनीकांत