पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० : जम्मू काश्मीरमधील ९९% निर्बंध हटवले

जम्मू काश्मीरची परिस्थिती पूर्ववत होत आहे, असा दावा सरकारने केला आहे.

कलम ३७० हटवल्याच्या मुद्यावर काश्मीर खोऱ्यात हिंसा आणि अशांतता पसरवण्याचा पाकच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. काश्मीर खोऱ्यातील ९९ टक्के निर्बंध हटवण्यात आले असून लवकरच स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास राज्य सरकारचे प्रवक्ता रोहित कन्सल यांनी व्यक्त केला आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीसंदर्भात शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द

रोहित कन्सल म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर या प्रदेशात बाहेरील दहशतवाद्यांच्या घुसखोरीनी हिसांचार रोखण्यासाठी काही निर्बंध घालण्याची आवश्यकता होती. नजर कैदेत असलेल्या राजकीय नेत्यांसोबतच अन्य लोकांना मुक्त करण्यासंदर्भातही योग्य पावले उचलली जात असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जम्मू काश्मीर प्रशासनाने सोमवारपासून सर्व पोस्टपेड मोबाइल सेवा सुरु करण्यासंदर्भातील घोषणा केली आहे.  

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

कन्सल पुढे म्हणाले, १६ ऑगस्टपासूनच काश्मीर खोऱ्यातील निर्बंध हळूहळू हटवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले होते. आठ ते दहा परिसर सोडले तर जवळपास सर्व ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात येण्याचे आवाहन केले असून पर्यटन स्थळावर इंटरनेट सेवा पुरवण्यात येत असल्याची माहिती देखील दिली आहे.  सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून पोस्टपेड मोबाइल सेवा सुरु करण्यात येणार आहे. शनिवारपासूनच ही सेवा सुरु करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. इंटरनेट सुविधा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.