पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२२ दिवस झाले सासू सासऱ्यांशी संपर्क नाही, कलम ३७० वरून उर्मिला मातोंडकर यांची सरकारवर टीका

उर्मिला मातोंडकर

राजकारणात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कलम ३७० वरून मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सासू- सासऱ्यांशी  कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. या परिस्थितीसाठी सरकार कारणीभूत असल्याशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे.
कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला. मात्र काश्मीरमध्ये अफवा पसरवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथला दूरध्वनी संपर्क बंद ठेवण्यात आला आहे. तिथल्या लोकांशी संपर्क साधण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नाही अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे. 

कलम ३७० : झायराशी संपर्क तुटल्यानं दिग्दर्शिका सोनाली बोस काळजीत

 कलम ३७० रद्द करण्याचा हा प्रश्न नाही आहे. ही गोष्ट अमानवी पद्धतीनं केली गेली, असं त्या म्हणाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या.  माझे सासू- सासरे काश्मीरमध्ये राहतात. त्या दोघांनाही मधुमेहाचा आणि उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. आज २२ दिवस उलटले. २२ दिवसांत आमचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. त्यांच्याकडे आजारपणासाठी पुरेसा औषधसाठा आहे की नाही हे देखील माहिती नसल्याचं त्या पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणल्या.

फत्तेशिकस्त : स्वराज्याच्या शत्रूला नामोहरण करणारा 'सर्जिकल स्ट्राईक'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:article 370 22 days now unable to speak to in laws in Kashmir Urmila Matondkar hit out at goverment