पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आर्टिकल १५' विरोधातील याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टाचा नकार

सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने हिंदी सिनेमा 'आर्टिकल १५'ला दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे आधी संबंधित अधिकार असलेल्या संस्थेकडे मांडावे, अशी सूचना न्यायालयाने केली. न्या. एस ए बोबडे आणि न्या. बी आर गवई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

... तर रिक्षाचालक आज रात्रीपासून संपावर

अभिनेता आयुषमान खुराना याची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २८ जूनला प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये काही वादग्रस्त संवाद आहेत. ज्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती.

न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी संबंधित याचिका मागे घेतली. या प्रकऱणी आधी संबंधित अधिकार असलेल्या संस्थेकडे आपले म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.