पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: पाक सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला

नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवान गस्त घालताना

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. १२-१३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी सैन्य घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला करत त्यांना प्रयत्न हाणून पाडला.

एलआयसीमध्ये ८ हजार पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

भारतीय जवानांनी आतापर्यंत पाकिस्ताकडून करण्यात आलेले १५ घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहे. वारंवार विरोध करुन देखील पाकिस्तान भारतामध्ये दहशतवाद्यांना घुसखोरी करुन पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या लॉन्चिंग पॅडवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. १२ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमने हाजीपूर सेक्टर येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मात्र भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला करत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

मध्य रेल्वेवर लवकरच स्वतःचे बॉम्ब शोधक पथक तैनात

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान वेगवेगळ्या पध्दतीने भारत सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहे. तेव्हापासून पाकिस्तांकडून भारताच्या दिशेने ग्रेनेड हल्ले आणि गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. काश्मीरमधील परिस्थीत खराब करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु आहे. 

'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण केले'