पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले

चिनी सैनिक

चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी केल्याचे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले आहे. 'एएनआय'ने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने चीनने भारतीय सीमेत घुसखोरी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

लष्करातील सूत्राने सांगितले की, चीनचे सैन्य साध्या वेषात आणि सामान्य वाहनात आले आणि डेमचौक परिसरातील नियंत्रण रेषेजवळ उभा राहिले. त्यावेळी ग्रामस्थ दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम करत होते. 

दरम्यान, चिनी सैनिकांनी चिथावणी देणारे कृत्य करत लडाखमधील डेमचोक परिसरातील भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे वृत्त काही माध्यमांत आले होते. या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी चीनचे सैनिक डेमचोक परिसरात सुमारे सहा किमी आत दाखल घुसले होते. तिथे दलाई लामांच्या जन्मदिनानिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमात अडथळा आणला आणि स्थानिक लोकांना धमकावल्याचे त्या वृत्तात म्हटले होते.