पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; १ जवान शहीद

सीमेवर तेैनात जवान (संग्रहित छायाचित्र) .(Nitin Kanotra /HT File Photo )

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने गेल्या एक आठवड्यापासून अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात अभियान चालवण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्यदलानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. परंतु, दोन्ही बाजूच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. 

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली शहांची भेट

पाकिस्तानने सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा नियंत्रण रेषेजवळील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार करुन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजौरी जिल्ह्यालगत असलेल्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय जवानांच्या पोस्टला निशाणा बनवला. 

या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. यावेळी पाकने नागरी भागातही मॉर्टर डागले. नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

राम मंदिरासाठी सोन्याची वीट देईन, पण एका अटीवर - मुघल वंशज हबीबुद्दिन तुसी