पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग हे काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत वाढ केली आहे. पाकिस्तानकडून घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराने हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सैन्यदलातील एका उच्चस्तरिय अधिकाऱ्याने सांगितले.

भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही: असदुद्दीन ओवेसी

भारतीय लष्कराच्या उत्तरेतील मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही पाकिस्तानकडून या भागात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या भागातील दैनंदिन जनजीवन अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. 

५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द झाले. त्यानंतर रोजच्या रोज नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जातो आहे. याच माध्यमातून काश्मीरमध्ये दहशतवादी घुसविण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कारवाया रोखण्यासाठीच आम्ही देशाच्या इतर भागांतूनही लष्कराचे जवान येथे बोलावले आहेत. नियंत्रण रेषा आणि सीमा रेषा याचा कोणताही भाग असा नाही की जिथे जवानांकडून सुरक्षा पुरविली जात नाही. सर्व ठिकाणी जवान तैनात आहेत आणि ते पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये भीषण कार अपघात; ४ हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू

या भागात नक्की किती सैन्यदल तैनात आहे, याबद्दल सविस्तरपणे कोणतीही माहिती देण्यास लष्कराने नकार दिला आहे. पण या सर्व घडामोडींशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी सांगितले की नियंत्रण रेषेवरील जवानांची संख्या हजारोंनी वाढविण्यात आली आहे.