पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पदभार स्वीकारताच रावत म्हणाले, आम्ही राजकारणापासून दूरच

सीडीएस बिपिन रावत

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जनरल बिपिन रावत यांनी आमचे लक्ष्य हे तिन्ही सैन्य मिळून तीन नव्हे तर ५ किंवा ७ करण्यावर भर असेल असे म्हटले आहे. तिन्ही सैन्य १+१+१= ३ नव्हे तर ५ किंवा ७ असतील, असे त्यांनी म्हटले. पीओकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, जी काही योजना बनवली जाते ती जाहीररित्या सांगितली जात नाही. लष्कराच्या राजकीय हस्तक्षेपावर प्रश्न विचारले असता त्यांनी सैन्यदल सरकारच्या आदेशावर काम करते. आम्ही राजकारणापासून खूप दूर असतो असे उत्तर दिले. 

लष्कर, नौदल आणि हवाईदल दरम्यान समन्वय स्थापन करणे. हे तिन्ही दले फोर्स टीम वर्कनुसार काम करतील. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम सीडीएस करेल, असे रावत यांनी सांगितले. गार्ड ऑफ ऑनर घेतल्यानंतर त्यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची भेटही घेतली.

दरम्यान, सकाळी रावत यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकस्थळी जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. लष्कराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तत्पूर्वी, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यानींही सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली आहे. मंगळवारी त्यांनी लष्कराचे २८ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. जनरल एम एम नरवणे यांना लष्कराने गार्ड ऑफ ऑनर दिला.