पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा

लष्कर प्रमुख बिपीन रावत

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल. पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातील कोणत्या मोहिमेसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे सांगत त्यांनी पाकला इशाराच दिला आहे.  

राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या पाकव्याप्त काश्मीर संदर्भातील भूमिकेवर बिपीन रावत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हा केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे. आमचे पुढचे लक्ष्य पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला भारतात सामावून घेणे हाच आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातील प्रश्नावर रावत म्हणाले की, लष्कर नेहमीच कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असते. यासंदर्भातील निर्णय हा सरकारच्या हाती असेल. सरकारच्या आदेशानुसार लष्कर कोणतीही कारवाई करण्यास सक्षम आहे. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला होता. आता पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातच होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले होते. याशिवाय ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करण्याचे भाष्य केले होते. 

कुलभूषण जाधव प्रकरणात भारत पुन्हा 'आयसीजे'कडे दाद मागणार