पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर: नियंत्रण रेषेवर पाककडून घुसखोरी, ७ जणांचा खात्मा

भारतीय लष्कराची कारवाई

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) आणि दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या ५ ते ७ जणांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. यात दहशतवाद्यांसह पाकिस्तानच्या बॅट कमांडोंचाही समावेश असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांचे मृतदेह नियंत्रण रेषेवरच पडून असल्याचे समजते.

मागील ३६ तासांपूर्वी भारतीय जवानांनी ही कारवाई केली आहे. या चकमकीनंतर भारतीय जवानांनी पुरावा म्हणून सॅटेलाइटच्या माध्यमातून मृतदेहाचे फोटो काढले आहेत. एएनआयने हे फोटो शेअर कले आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. भारतीय सैन्याची दिशाभूल करुन दहशतवाद्यांना  भारतात घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा डाव आहे. मात्र, भारताने त्यांचे इरादे उधळून लावत चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय सुरु आहे? अब्दुल्ला यांचा संतप्त सवाल