पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदेश मिळताच योग्य ती कारवाई करू; लष्करप्रमुखांचे POKबाबत मोठे वक्तव्य

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी  पीओकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा संकल्प संसदेने केला आहे.  पीओके भारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर याबाबत आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करु. दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे.

युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराणी सैन्यांची कबुली

पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचं नरवणे यांनी सांगितले. नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर आम्ही करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई सुरु केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

VIDEO: कोचीमध्ये काही मिनिटातंच अलिशान इमारत जमीनदोस्त

त्यांनी पुढे असे सांगितले की, आपले जवान हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे आणि भविष्यात त्यांच्या प्रशिक्षणावर आमचा जास्त भर असेल. चीनकडून सीमाभागातील सैन्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासंदर्भात लष्करप्रमुख नरवणे म्हणाले की, आम्ही उत्तर सीमेवरील उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यास तयार आहोत.

हरियाणात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; डान्सर दिव्या चौधरीला अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:army chief manoj mukund naravane said when we get order for pok then will take proper action