पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भविष्यातील संघर्ष अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचेः लष्करप्रमुख

लष्करप्रमुख बिपीन रावत

कारगिल युद्ध विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भविष्यातील संघर्ष हे अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचे असतील. यात तांत्रिक आणि सायबर डोमेनची भूमिका मोठी असेल, असे ते म्हणाले. 

सैन्य दलाला प्रत्येक प्रकारचे युद्ध (मल्टि स्पेक्ट्रम वॉर) तयार राहिले पाहिजे. नॉन स्टेट अॅक्टर्स आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या दबावाने युद्धाची स्थिती बदलली आहे. सायबर जगत आणि अंतराळाचा उपयोग आज युद्धात मोठी भूमिका निभावत आहे. 

चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेत डेमचोक सेक्टरमधील घुसखोरीबाबत माध्यमांत आलेले वृत्त फेटाळत त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. चीन त्यांनी मानलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेवर येतात आणि गस्त घालून जातात. आम्ही त्यांना रोखतो. अनेकवेळा स्थानिक स्तरावर कार्यक्रम असतात. डेमचोक सेक्टरमध्ये तिबेटी नागरिक आनंद साजरा करत होते. त्यामुळे काही चिनी तिथे काय होत आहे, हे पाहण्यासाठी आले होते. पण कोणतीही घुसखोरी झाली नाही. सर्व स्थिती सामान्य आहे, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Army chief General Bipin Rawat says future conflicts will be more violent at 20th Kargil anniversary