पाकिस्तानच्या ताब्यातील बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्याचे अड्डे सक्रीय झाले असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. त्याचवेळी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानमधील हस्तक यांच्यातील संपर्क तुटला आहे. पण काश्मीर खोऱ्यातील लोकांमधील संपर्क अजिबात तुटलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून तेथील दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले होते.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून - सूत्र
पाकिस्तानातून भारतामध्ये दहशतवादी पाठविता यावेत, यासाठीच त्यांच्याकडून कायम शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. पण त्यांच्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे हे भारतीय लष्कराला व्यवस्थित माहिती असल्याचेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी कमी करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यामुळे चिडलेला पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी जैश ए मोहम्मदची मदत घेत आहे. पाकिस्तानच्या कृपेमुळे जैशने आपले उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय केले आहेत. तिथे ४० जणांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
Army Chief General Bipin Rawat: Balakot has been re-activated by Pakistan, very recently. This shows Balakot was affected, it was damaged; it highlights some action was taken by the Indian Air Force at Balakot & now they have got the people back there. pic.twitter.com/IFN7SjJDud
— ANI (@ANI) September 23, 2019