पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा हिंमत करु नका, नाहीतर..,लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

लष्करप्रमुख बिपिन रावत

कारगिल युद्धात शूर भारतीय जवानांनी पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले होते. अशी चूक पुन्हा न करण्याचा इशारा भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकला दिला आहे. कारगिल युद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास तुमच्या नाकातून रक्त वाहेल, अशी तंबीच रावत यांनी इस्लामाबादला दिली आहे. 

कारगिलमध्ये भारताच्या विजयाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना रावत म्हणाले की, असं चुकूनही ही करु नका. दुर्घटनेची पुनरावृत्ती होत नसते. पुढीलवेळी तुमच्या नाकातून रक्त वाहिल. 

छेडछाडीची तक्रार करणाऱ्या मुलीच्या चारित्र्यावर पोलिसानेच घेतला संशय

वर्ष १९९९मध्ये भारताच्या पाकिस्तानवरील विजयानिमित्त प्रत्येक वर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. जनरल रावत यांनी म्हटले की, पाकिस्तानने दहशतवादी आणि त्यांच्या नेटवर्कविरोधात कारवाई करण्याचे जे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण त्यांना केवळ आंतरराष्ट्रीय निधी मिळवायचा होता.

Vijay Diwas : कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम

काश्मीरसह इतर जागांवर दहशतवाद पसरवणे आणि त्याचे समर्थन करण्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर फजिती होत आहे. काश्मीरमधील कट्टरवादी विचार जिवंत ठेवणे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Army chief Bipin Rawat warns to Pakistan on Kargil Vijay Diwas says You will get bloodier nose next time