पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कारगिल सारखी चूक पाक पुन्हा करणार नाही : लष्कर प्रमुख

लष्कर प्रमुख बिपीन रावत

पाकिस्तानने भारताविरुद्ध कोणते कारस्थान करण्याचे धाडस करणार नाही, असा विश्वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. कारगिल विजय दिवसच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रावत म्हणाले की, "१९९९ मध्ये झालेले कारगिल युद्ध पाकची मोठी चूक होती. पाकिस्तानी लष्कर भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. त्यांना आमची ताकद समजली आहे. सध्याच्या घडीला भारताकडे पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेची यंत्रणा आहे. त्यामुळे घुसखोरांना शोधणे सहज शक्य आहे." २६ जुलैला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापतींवर भाष्य केले.   

दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे बेकायदा कृत्ये नियंत्रण विधेयक लोकसभेत मंजूर

जनरल रावल पुढे म्हणाले की, "भारतीय जवान सीमेवर नेहमची सतर्क असतात. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी लष्करही तैनात आहे. आम्ही नेहमीच त्यांना बॅकफूटवर ठेवले आहे. आणि पुढेही तसेच ठेवू. आता पाकिस्तान कारगिलसारखी चूक पुन्हा करणार नाही."  

लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात स्थानिक दहशतवाद्यांचा हात असल्याचे म्हटले होते. यावर रावत म्हणाले की, आपल्या सर्वांना सत्य काय आहे ते माहित आहे. त्यामुळे एका वक्तव्याने गोष्टी बदलणार नाहीत. भारतीय गुप्तचर संस्थांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.