पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोण आहे PM मोदींच्या टि्वटर हँडलवरुन टि्वट करणारी आरिफा

आरिफा

आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटर हँडलवरुन टि्वट करणारी काश्मीरची आरिफा तिसरी महिला ठरली आहे. क्राफ्ट मॅनेजमेंटची पदवी घेतल्याचे श्रीनगरची रहिवासी आरिफाने सांगितले. एकेकाळी काश्मीरची शान असलेली ही हस्तकला अंतिम घटका मोजत असल्याचे ती म्हणाली. यावेळी आरिफाने हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नाबाबत सांगितले. तसेच महिलांना नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देण्यासाठी उद्योजक होण्याचे आवाहन केले. 

बॉम्बस्फोटात हात गमावलेल्या मालविकांना मोदींनी दिला हा मान

मला फिल्ड व्हिजिटसाठी कारागिरांच्या घरी नेले जात असत. त्यावेळी कारागिरांच्या परिस्थितीबाबत मला समजले, हस्तकला अखेरच्या घटका का मोजत आहे, हे लक्षात आले. कारागिरांना त्यांच्या मेहनतीनुसार मजुरी मिळत नाही. त्यामुळे हस्तकलेला मोठा धक्का बसला, असे आरिफा म्हणाली.

काश्मीरमध्ये राहून काश्मीरसाठी काही ना काही अवश्य करायचे आहे, असे आरिफाने ठरवले आहे. नमदा हस्तकलामध्ये पुन्हा उभारी आणण्याचा तिने प्रयत्न सुरु केला आहे. 

मोदींना पासवर्ड विचारणाऱ्याला मिळाले हे उत्तर

नमदा महिला कारागिरांना दररोज ५० रुपये मिळतात. परदेशातील याची निर्यातही घसरली असून ती २ टक्क्यांवर पोहोचली असल्याचे आरिफाने म्हटले आहे. आरिफाने महिलांचा एक समूह बनवला असून तो नमदा हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी झटत आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांनी चांगला व्यवसाय उभारला आहे. 

धर्मेंद यांचे नवे He Man रेस्तराँ महापालिकेकडून सील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त आपले सोशल मीडिया अकाऊंट महिलांच्या हाती सोपवला आहे. त्यांनी देशभरातून सात प्रेरणादायी महिलांची यासाठी निवड केली आहे. त्या सातत्याने टि्वट करत आहेत. सुरुवातीला स्नेहा मोहनदास यांनी टि्वट केले तर नंतर मालविका अय्यर यांनी टि्वट केले. आता आरिफा यांनी टि्वट केले आहे.