पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने उपस्थितांना विचारला प्रश्न

सोनाली फोगाट

पाकिस्तानमधून आला आहात का?, पाकिस्तानी आहात का?, जर भारतीय आहात तर मग भारत माता की जय म्हणा... हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या आणि टिकटॉक या ऍपवरील प्रसिद्ध व्यक्ती सोनाली फोगाट यांनी विचारलेला हा प्रश्न. आपल्या सभेसाठी जमलेले काही लोक घोषणा देत नसल्याचे पाहून सोनाली फोगाट यांनी हा प्रश्न विचारला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला आग; हार्बर रेल्वे विस्कळीत

हिसार जिल्ह्यातील बालसामंद गावात सोनाली फोगाट यांची सभा होती. त्यावेळी जमलेल्या नागरिकांना त्यांनी हा प्रश्न विचारला. काही जण घोषणा देत नसल्याचे पाहून त्यांनी स्वतःच भारत माता की जय अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्या म्हणाल्या की, भारतीय असूनही केवळ राजकारणासाठी तुम्ही घोषणा देत नसल्याचे बघून मला तुमची लाज वाटते. जे लोक भारत माता की जय म्हणत नाहीत. त्याच्या मताला काहीही किंमत नाही, असेही त्या म्हणत असल्याचे या संदर्भातील व्हिडिओत दिसते आहे.

यानंतर त्यांनी आपले भाषण करताना या भागात एक महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या आश्वासनाचे स्वागत केले आणि भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या.

मुक्ता टिळकांच्या प्रचारपत्रकात लोकमान्यांचा फोटो नसल्याने आश्चर्य

काँग्रेसचे स्थानिक आमदार कुलदीप बिष्णोई यांच्याविरोधात भाजपने सोनाली फोगाट यांना उमेदवारी दिली आहे. ज्या प्रमाणे अमेठी लोकसभा मतदारसंघात स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. त्याचप्रमाणे या मतदारसंघात मी कुलदीप बिष्णोई यांचा पराभव करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Are you Pakistanis BJP candidate and TikTok celeb Sonali Phogat to those not chanting Bharat Mata ki Jai