पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Khelo India 2020: सरावा दरम्यान खेळाडूच्या गळ्यात घुसला बाण

खेळाडू जखमी

आसामची राजधानी गुवाहाटी येथे सुरु होणाऱ्या 'खेलो इंडिया' गेम्सच्या आदल्या दिवशीच एक मोठी दुर्घटना घडली. सरावा दरम्यान एक खेळाडू गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खेलो इंडिया गेम्सला सुरुवात होण्यापूर्वीच गुरुवारी सरावा दरम्यान धनुर्धर शवांगिनी गोहेन गंभीर जखमी झाली आहे.

जेएनयू हिंसाचार: ३ प्राध्यापकांची दिल्ली हायकोर्टात धाव

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आसामची १२ वर्षांची शिवांगिनी गुरुवारी डिब्रुगढच्या छबुआ येथे सराव करत होती. त्याच दरम्यान तिच्या गळ्यामध्ये बाण घुसला आणि ती गंभीर जखमी झाली. ताबडतोब शिवांगिनीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. 

'राज्यातील शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार'

एअरलिफ्टच्या सहाय्याने शिवांगिनी गोहेनला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्समध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. शिवांगिनी गोहेन स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ची प्रशिक्षणार्थी आहे. तिच्या उपचाराचा सर्व खर्च स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच करणार आहे. 

विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर; मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला