दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाची विषाणूची प्रकरणे वाढली आहेत. याप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रेटिंनी आपली नाराजी जाहीर केली आहे. नुकताच ऋषि कपूर आणि नवाजदुद्दीन सिद्दीकी यांनीही यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. आता सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए आर रहमान याने तबलिगी जमातवरुन लोकांना खास आवाहन केले आहे.
कोण आहेत कोरोनाचे अपडेट देणारे IAS अधिकारी लव अग्रवाल, वाचा
रहमानने देशातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवताना एक टि्वट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांकडे इशारा करत ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रहमानने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, हा संदेश सर्व डॉक्टर, नर्स आणि त्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आहे, जे संपूर्ण भारतातील रुग्णालय आणि दवाखान्यात अत्यंत धाडसाने काम करत आहेत. एखाद्याच्या मनाला भावण्यासाठी हे पुरेसे आहे. आमचे आयुष्य वाचवण्यासाठी ते स्वतःचे जीवन संकटात टाकत आहेत.
कोविड आणि कोरोना, दाम्पत्यांनी केलं जुळ्यांचं नामकरण
तो पुढे म्हणाला की, ही वेळ आपल्यातील मतभेद विसरुन या अदृश्य शत्रूविरोधात एकजूट होऊन काम करण्याची आहे. या शत्रूने संपूर्ण जगात गोंधळ माजवला आहे. मानवता आणि आध्यात्मिकतेवर आपल्याला अंमल करायची वेळ आहे. सध्या आपल्याला आपले शेजारी, ज्येष्ठ नागरिक, गरीब आणि प्रवासी कामगारांची मदत करायची आहे.
This message is to thank the doctors, nurses and all the staff working in hospitals and clinics all around India, for their bravery and selflessness... pic.twitter.com/fjBOzKfqjy
— A.R.Rahman (@arrahman) April 1, 2020
ईश्वर तुमच्या हृदयात आहे. त्यामुळे धार्मिक स्थळावर एकत्र येत अराजकता माजवण्याचा हा काळ नाही. सरकारचा सल्ला ऐका. काही आठवड्यांसाठी स्वतःचे विलगीकरण, तुम्हाला आयुष्यातील अनेक वर्षे देऊ शकतो. विषाणूचा फैलाव करु नका आणि आपल्या सहकाऱ्यांना नुकसान पोहोचवण्याचे कारण बनू नका. हा आजार तुम्हाला इशारा देत नाही. त्यामुळे तुम्ही संक्रमित नाही हे समजू नका. ही अफवा पसरवण्याची, अधिक चिंता आणि भीती पसरवण्याची वेळ नाही. दयावान आणि विचारशील बना, लाखो लोकांचे आयुष्य आपल्या हातात आहे.
राज्यातील ३० शासकीय रुग्णालये 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत