पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

iPhone 11 लॉन्चिंगपूर्वी Apple Store ची वेबसाइट डाउन

कॅलिफोर्नियातील कूपर्टिनो येथील अ‍ॅपलच्या कार्यालयात रंगला सोहळा

अ‍ॅपल कंपनीच्या बहुप्रतीक्षित आयफोन्सच्या लाँचिंग सोहळ्यापूर्वी Apple Store ची वेबसाइट डाउन झाली आहे. या लाँचिंग सोहळ्याची उत्सुकता तमाम अ‍ॅपलप्रेमींना लागून आहे. सालाबादप्रमाणे कंपनी मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे अकराच्या सुमारास आपले नवे फोन्स, गॅझेट लाँच करणार आहे. स्मार्टफोनमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या अ‍ॅपल उत्पादनाची जगभरात प्रचंड लोकप्रियता दिसून येते.

आयफोन ११' पासून ते बरंच काही, अ‍ॅपलची खास भेट

आपले डिव्हाइस प्रदर्शित करण्यासाठी कंपनी वेबसाइटमध्ये बदल करत असताना काही काळासाठी वेबसाइट डाउन झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी सप्टेंबरध्ये अ‍ॅपल आपल्या ग्राहकांसाठी नवे उत्पादन घेऊन येत असते. लॉन्चिंगदरम्यान iPhone 11 सीरीजमधील iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max ही नवी उत्पादने लॉन्च करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कूपर्टिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या संकुलातील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये लॉन्चिंगचा सोहळा पार पडणार आहे. अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता आहे. आयफोनसह इतर कोणत्या उत्पादने बाजारात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.