पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

८ अपाचे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात, सुरक्षा अधिक मजबूत

अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मंगळवारी अपाचेची ८ लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले. पठाणकोटमधील हवाई तळावर हा कार्यक्रम झाला. नव्या हेलिकॉप्टरची पूजाही करण्यात आली. अमेरिकेत निर्मित करण्यात आलेली ही हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल झाल्यामुळे आपली ताकद वाढली आहे. अपाचे एएच ६४ ई या जातीची ही लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल आर नंबियार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

उरण येथील ONGC प्लॅंटमध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू

अपाचे एएच ६४ ई हे सध्याचे जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ पद्धतीचे हेलिकॉप्टर आहे. खुद्द अमेरिकेकडून याच हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. तेच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल होणार असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे, अशी माहिती हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

सप्टेंबर २०१५ मध्ये या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी अमेरिकी सरकार आणि बोईंग कंपनीशी करार करण्यात आला होता. एकूण २२ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात टप्याटप्याने दाखल होणार आहेत. याआधी चार अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत.