पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध

कोरोना टेस्ट

कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर उपयु्क्त ठरल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाची तीव्र लक्षणे आहेत त्यांना या औषधाचा उपयोग होत असल्याचे दिसून आले.

दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

अमेरिकेतील साथरोग नियंत्रण विभागाचे संशोधक एँथनी फॉसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते आहे. आतापर्यंत या औषधांचे पाच दिवसांचे आणि दहा दिवसांचे डोस रुग्णांना देऊन त्याची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये असे दिसून आले की ज्या रुग्णांना या औषधाचा १० दिवसांचा डोस देण्यात येतो त्यांच्या प्रकृतीत जेवढी सुधारणा होते. तेवढीच पाच दिवसांचा डोस देणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीतही होते आहे.

कोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा

कॅलिफोर्नियातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी जीलीड सायन्सेसने या चाचण्या घेतल्या. त्यातूनच हे निष्कर्ष दिसून आले. एकूण ३० देशांमध्ये या कंपनीचे काम चालते.