पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे बेकायदा कृत्ये नियंत्रण विधेयक लोकसभेत मंजूर

अमित शहा

दहशतवाद्यांच्या विरोधातील कायदा आणखी कडक करणारे आणि एकट्या व्यक्तीलाही दहशतवादी ठरवू शकणारे बेकायदा कृत्ये (नियंत्रण) सुधारणा विधेयक २०१९ बुधवारी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. सरकारने मांडलेल्या या विधेयकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये जोरदार समर्थन केले. 

'पाकिस्तानमध्ये ३० ते ४० हजार दहशतवादी सक्रीय'

आपल्या भाषणामध्ये अमित शहा म्हणाले, इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ हा खूप दिवसांपासून भारतीय तपास संस्थांच्या रडारवर होता. पण त्याला जर आधीच दहशतवादी ठरविता आले असते, तर त्याला अटकही करता आली असती. त्याचबरोबर त्याने केलेल्या दहशतवादी कारवायाही रोखता आल्या असत्या.

या विधेयकाचा विरोध करताना विरोधी पक्षातील सदस्यांनी या कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो, असे सभागृहात सांगितले. त्यालाही अमित शहा यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. ते म्हणाले, गुन्हेगारी दंड संहितेचाही गैरवापर केला जाऊ शकतो. मग ती सुद्धा रद्द करायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्यावर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेतील ३०२ चा हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनेकवेळा त्यांना सुद्धा न्यायालयाकडून निर्दोष सोडले जाते. मग कलम ३०२ सुद्धा रद्द करायचे का, असाही प्रश्न त्यांनी अध्यक्षांमार्फत सभागृहाला विचारला.

ड्रेसिंगरुममध्ये दादागिरीची संस्कृती नाही : कोहली

दहशतवादाविरोधात लढणाऱ्या तपाससंस्थांना सध्या कडक कायद्याची गरज आहे. ज्या कायद्याच्या साह्याने ते अशा कारवाया करणाऱ्यांना रोखू शकतील, असे अमित शहा म्हणाले.