पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UAPA दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, एका व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येणार

UAPA दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत शुक्रवारी बेकायदा कृत्य प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक २०१९ (यूएपीए) विधेयक मोठ्या वादावादीनंतर संमत झाले. प्रस्तावाच्या बाजूने १४७ मते तर विरोधात ४२ मते पडली. तत्पूर्वी, काँग्रेसकडून राज्यसभा खासदार पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांनी एक व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याच्या सरकारच्या हेतूवर शंका उपस्थितीत केली. चिदंबरम म्हणाले की, संघटनांना आधीच दहशतवादी घोषित केले जात आहे. अशात व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची गरज आहे का, असा सवाल केला. याला उत्तर गृहमंत्री अमित शहा उभे राहिले आणि त्यांनी एक उदाहरण देऊन याची उपयुक्तता सांगितली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारवरही हल्लाबोल केला. 

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट, यात्रेकरूंना काश्मीर सोडण्याची सूचना

गृहमंत्री शहा यांनी म्हटले की, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकल २००९ पासून अनेक प्रकारात पोलिसांना हवा होता. कोलकाता पोलिसांनी त्याला पकडले. त्याने आपले बनावट नाव सांगितले. त्यावेळी पोलिसांकडे त्याच्या ओळख किंवा खून नव्हती. अखेर त्यांनी त्याला त्यावेळी सोडले. यासिन तेथून निसटला. जर २००९ मध्येच त्याला दहशतवादी घोषि केले असते तर देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये त्याचे छायाचित्र आणि हाताचे ठसे असले असते, तो निसटला नसता.

अयोध्या वादावर ६ ऑगस्टपासून रोज सुनावणीः सुप्रीम कोर्ट