पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांच्या निवासस्थानाकडे निघालेला शाहिन बाग आंदोलकांचा मोर्चा स्थगित

अमित शहांच्या निवासस्थानाकडे निघालेला शाहिन बाग आंदोलकांचा मोर्चा स्थगित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या शाहिन बागमधील आंदोलकांनी परवानगी न मिळाल्यामुळे आपला मोर्चा मागे घेतला. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. आंदोलकांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी गृह मंत्रालयाला वेळही मागितली नव्हती. अमित शहा हे दिल्लीतील कृष्ण मेनेन मार्गावरील निवासस्थानी राहतात. या निवासस्थानात पूर्वी माजी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे राहत होते. 

...नाहीतर पंतप्रधान मोदींची माफी मागाः फडणवीस

परवानगी न मिळाल्यामुळे शाहिन बागेतील आंदोलकांनी आपल्या मोर्चा स्थगित केला. सीएए विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शाहिन बाग येथे आंदोलन सुरु आहे. 

दरम्यान, दक्षिण पूर्वचे पोलिस उपायुक्त आरपी मीना म्हणाले की, शाहीन बागच्या आंदोलकांनी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. कारण यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याला मंजुरी मिळाली नव्हती.