पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद : त्याच ठिकाणी आढळला दुसऱ्या महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

प्रातिनिधिक छायाचित्र

हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार  करून जाळल्याची घटना ताजी असतानाच त्याच भागात आणखी एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं एकाच खळबळ उडाली आहे.  २७ नोव्हेंबरला हैदराबाद-बेंगळुरू महामार्गानजीकच्या शमशाहबाद परिसरात पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आलं होतं, तिचा अर्धवट जळालेला मृतदेह गुरुवारी पोलिसांना आढळला.  या घटनेवरून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. 

धुळेः मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, ७ जण ठार

अशातच याच परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत  दुसऱ्या महिलेचाही मृतदेह आढळला आहे. या महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या महिलेला जाळण्यात आलं आहे की तिनं स्वत:ला पेटवून आत्महत्या केलीये हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.  हैदराबाद पोलिस या प्रकरणाचा अधिक तापस करत आहेत. 

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले, ४ जण अटकेत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Another womans burnt body found in same locality where Hyderabad veterinarian was raped and set ablaze