पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक- अमित शहा

अमित शहा (REUTERS)

आयसीसी विश्वचषक २०१९ च्या रविवारच्या सामन्यात भारताने सातव्यांदा पाकिस्तानवर विजय मिळावल्यानंतर क्रिकेट चाहत्यांबरोबरच भारतीय नेत्यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. तर इतर नेत्यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शहा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानच्या संघावर टीम इंडियाचा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक आणि परिणामही पहिल्यासारखाच. संपूर्ण संघाला खूप-खूप प्रेम आणि शुभेच्छा. तुमची कामगिरी शानदार होती. भारतातील प्रत्येक नागरिक या विजयावर अभिमान बाळगत आहे. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये पाकिस्तानविरोधात विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला शुभेच्छा. भारतीय संघाने या विजयासाठी चांगला खेळ केला. आम्हाला सर्व संघावर अभिमान आहे.

नितीन गडकरी यांनी विजयावर आनंद जाहीर करत टि्वट केले की, टीम इंडियाने खूप चांगला खेळ केला आहे. या शानदार विजयासाठी अभिनंदन. जय हिंद ! #teamblue #indvspak #CWC19' 

त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियूष गोयल, राज्यवर्धन राठोड, सचिन पायलट, देवेंद्र फडणवीस, अशोक गेहलोत यांनीही भारताच्या विजयासाठी सोशल माडियावर टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.