पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साक्षी आणि अजितेश प्रकरणाला पुन्हा नवे वळण, स्क्रिन शॉट व्हायरल

साक्षी-अजितेश

उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा नवरा अजितेश यांच्यासंदर्भात एक नवी माहिती सोशल मीडियामुळे पुढे आली आहे. साक्षीने दलित समाजातील अजितेश याच्याशी लग्न केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा विषय उत्तर प्रदेशात चर्चेत आला आहे. आता फेसबुक वॉलवरील एक इमेज सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

कर्नाटकात विश्वासदर्शक ठरावावेळी काय घडू शकते, तीन शक्यता

साक्षी मिश्रा हिचेच फेसबुक अकाऊंट सीनू मिश्रा या नावाने आहे. याच अकाऊंटवरून अजितेशच्या एका फोटोवर साक्षीने 'बेस्ट पिक यो यो' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजितेशने सीनूला टॅग करत 'थॅंक्स बहना' लिहिले आहे. या दोन्ही प्रतिक्रियांचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे. अजितेशने साक्षीला टॅग करताना बहना लिहिल्यामुळे हा स्क्रिन शॉट व्हायरल झाला आहे. 

साक्षी मिश्रा आणि अजितेश या दोघांना एकत्र राहण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वडिलांच्या गुंडांकडून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार साक्षीने न्यायालयात केली होती. त्यानंतर हे दोघेही मंगळवारी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होते.

आई-बाबांमधील भांडणाने त्रस्त मुलाचे राष्ट्रपतींना पत्र

साक्षी मिश्रा यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही जणांनी साक्षी मिश्रा यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले आहेत. साक्षी मिश्रा हिचे अधिकृत ट्विटर हँडल (@ i_ sakshimishra) या नावाने २०१५ मध्येच तयार करण्यात आले आहे.