पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींना मत देता आणि मला प्रश्न सोडवायला सांगता, कुमारस्वामी भडकले

कुमारस्वामी आंदोलकांशी बोलताना

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी बुधवारी एक नवा वाद ओढवून घेतला. जर तुम्ही भाजपला मतदान केले आहे, तर मग आता प्रश्न घेऊन माझ्याकडे का आलात, असा सवाल त्यांनी रायचूर जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्रातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी बोलताना केला. 

रायचूर जिल्ह्यातील मन्वी तालुक्यातील कारेगुड्डा गावाकडे कुमारस्वामी यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. त्यावेळी ही घटना घडली. येरमारूस औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कुमारस्वामी ज्या बसमधून निघाले होते. तिच्या समोर थांबून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी कुमारस्वामी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. 

काँग्रेस पराभूत म्हणजे देशाचा पराभव का?, मोदींचा सवाल

घोषणाबाजीमुळे चिडलेल्या कुमारस्वामी यांनी कर्मचाऱ्यांना फटकारले. जर तुम्ही निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला मतदान केले आहे. तर मग आता माझ्याकडे मदत मागायला का आलात. तुम्ही मोदींना मतदान करणार आणि मी तुमचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा ठेवणार. हे योग्य नाही. मी पोलिसांना तुमच्यावर लाठीचार्ज करायला सांगेन, असा इशारा यावेळी कुमारस्वामी यांनी आंदोलकांना दिला.