पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगन रेड्डींचा आणखी एक निर्णय, चंद्राबाबूंच्या पुत्राच्या सुरक्षेत कपात

जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशच्या नवनिर्वाचित सरकारने माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्राबाबू यांचे पुत्र आणि माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना आता २+२ गनमनची सुरक्षा मिळेल. यापूर्वी त्यांना झेड दर्जाची सुरक्षा मिळत होती. त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांची सुरक्षाही हटवण्यात आली आहे. 

यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आंध्र प्रदेशमधील गन्नवरम विमानतळावर त्यांची झडतीही घेण्यात आली होती. विमानापर्यंत जाण्याची त्यांची व्हीआयपी सुविधा काढण्यात आली होती. त्यांनी पूर्वी झेड प्लस सुरक्षा दिली जात. ही सुरक्षा त्यांना २००३ पासून दिली जाते. त्यावेळी तिरुपती अलीपीर येथे त्यांच्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता. 

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपत

तत्पूर्वी, मुख्यमंत्री वायएस जगममोहन रेड्डी यांनी सोमवारी प्रजा वेदिका (कॉन्फरन्स हॉल) पाडण्याचे आदेश दिले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Andhra Pradesh government reduces security of former CM N Chandrababu Naidu his son Nara Lokesh