पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला अत्याचारविरोधात आंध्रात नवा कायदा, तीन आठवड्यांत शिक्षा

महिलांवरील अत्याचाराविरोधात देशभर निदर्शने करण्यात आली. (संग्रहित छायाचित्र)

महिलाविरोधी लैंगिक आणि इतर अत्याचाराच्या घटनांचा २१ दिवसांच्या आत निकाल लावून दोषींना फाशीपर्यंतची शिक्षा तातडीने देण्याची तरतूद असलेले विधेयक आंध्र प्रदेश विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले. या नव्या कायद्याला आंध्र प्रदेश दिशा गुन्हेगारी विषयक कायदा २०१९ असे नाव देण्यात आले आहे. 

मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरुन तरुणीने उडी मारली

हैदराबादमध्ये पशू वैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने हा नवा कायदा आणला आहे. 

राज्याचे गृह मंत्री एम सुचरिता यांनी हे विधेयक आंध्र प्रदेश विधानसभेत मांडले. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने या विधेयकाला क्रांतीकारी असे म्हटले आहे.